MahaDBT Tokan Yantra : शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्याला एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्याला त्या प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत वेगवेगळे कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.
परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्यांना कृषि कार्यालयात चकरा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल, यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना (MahaDBT Tokan Yantra) हे पोर्टल तयार केले आहे.
आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र (CSC Center) किंवा जवळील कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात.
टोकन यंत्र (MahaDBT Tokan Yantra)
महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि विभागामार्फत टोकन यंत्र (MahaDBT Token Yantra) साठी अनुदान देय आहे. हे टोकन यंत्र मनुष्यचलित आहे या यंत्राच्या सहाय्याने आपण सोयाबीन, हरभरा, मका, इ. पिके लागवड करू शकतो. हे यंत्र शेतकर्यांसाठी अतिशय उपयोगी आहे आणि वापरण्यास देखील सोयिस्कर आहे. तर, जे शेतकरी बांधव हे यंत्र घेऊ इच्छित आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि कृषि विभागाकडून देण्यात येणार्या अनुदानाचा फायदा घ्यावा.
टोकन यंत्र अनुदान
महाडीबीटी पोर्टल द्वारे मनुष्य चलित टोकन यंत्र साठी खालील प्रमाणे अनुदान देय आहे. MahaDBT Tokan Yantra
>> लहान सीमान्त शेतकरी/अल्पभूधारक : किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.10,000/-
>> बहुभूधारक शेतकरी : किंमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त रु.8,000/-
वरील प्रमाणे अनुदान देय आहे.
अनुदानावरती टोकन यंत्र (MahaDBT Tokan Yantra) खरेदी करताना त्या टोकण यंत्राचा टेस्ट रीपोर्ट असणे आवश्यक आहे आणि तसेच ज्या विक्रेत्याकडून आपण यंत्र खरेदी करणार आहोत त्यांच्याकडे ते यंत्र विकण्यासाठी डीलरशिप प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.
टोकन यंत्र असा करा अर्ज
महाडीबीटी पोर्टल द्वारे मनुष्य चलित टोकन यंत्र (MahaDBT Tokan Yantra) साठी खालील दिलेल्या पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करा.
स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)
स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा
स्टेप 3: कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडावी
स्टेप 4: तपशील मध्ये मनुष्य चलित औजारे
स्टेप 5: यंत्र सामग्री मध्ये टोकन यंत्र हा पर्याय निवडा
स्टेप 6: मशीनचा प्रकारा टोकन यंत्र हा निवडा
स्टेप 7: अर्ज जतन करावा
स्टेप 8: मुख्य पृष्ठ वरती यावे
स्टेप 9: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 10: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा
वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर मनुष्य चलित टोकन यंत्र साठी अर्ज सादर करू शकता. MahaDBT Tokan Yantra
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतामध्ये वापर करण्यासाठी विविध कृषी यंत्र व अवजारे यांचा देखील लाभ दिल्या जातो. तर या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उपयोगी विविध कृषी यंत्र व अवजारे जसे की ट्रॅक्टर ट्रॅक्टरचलित यंत्र तसेच पावर टिलर कल्टीवेटर नांगर रोटावेटर पेरणी यंत्र असे विविध कृषी यंत्र व अवजारे शासनामार्फत अनुदानावरती दिले जातात. (MahaDBT Yojna)
कृषी यांत्रिकीकरण घटकांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महाडीबीटी (MahaDBT Tokan Yantra) शेतकरी योजना या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज ऑनलाइन सोडत साठी ग्राह्य धरला जातो त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणाची सोडत यादी काढण्यात येते या सोडत यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी करत मोबाईल वरती निवड बाबतचा संदेश पाठविला जातो आणि कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातात.
कृषी यांत्रिकीकरण साठी संबंधित शेतकऱ्यांनी निवड झाल्यानंतर यंत्राचे कोटेशन यंत्राचा पेस्ट रिपोर्ट सातबारा होल्डिंग आधार बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Tokan Yantra) अपलोड करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी केले जाते आणि त्यानंतर निवड झालेल्या घटक साठी संबंधित शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र दिल्या जाते आणि पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी निवड झालेल्या घटक खरेदी करून त्याचे ध्येय म्हणजेच बिल हे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते.