Posted in

MahaDBT Onion Storage Structure : शेतकर्‍यांना कांदाचाळ उभारणी साठी मिळणार अनुदान

MahaDBT Onion Storage Structure
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Onion Storage Structure : शेतकरी शेतकरी बांधवांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाकडून शेती विषयक विविध योजना अंतर्गत शेती उपयोगी अवजारे व घटक इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जातात. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व शेती उपयोगी कृषी यंत्र अवजारे व इतर घटक हे अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

 

महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित अवजारे साठी अर्ज करू शकतात त्यासोबतच फलोत्पादन अंतर्गत शेतकरी हे कांदा चाळ उभारणीसाठी देखील आता ऑनलाईन अर्ज करू शकतील. (MahaDBT Onion Storage Structure)

 

होय तर राज्यातील शेतकरी कांदा चाळ उभारणीसाठी सुद्धा शासनाकडून अनुदानाचा लाभ घेऊ शकतात यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर कांदा चाळ घटक यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

 

राज्यातील बरेच शेतकरी कांदा या पिकाची लागवड करतात त्यानंतर कांदा काढल्यानंतर योग्य भाव मिळण्यासाठी त्याची साठवणूक केली जाते. परंतु कांदा या पिकाला साठवणीसाठी जागा नसल्यामुळे कांदा लवकर खराब होतो आणि परिणामी योग्य दर मिळत नाही त्यामुळे आता शेतकरी कांदा चाळ उभारणी करून तो कांदा साठवण करून बाजारात योग्य दर मिळाल्यानंतरच बाहेर काढणे शक्य होईल.

 

कांदा चाळ घटक उभारणीसाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त 87 हजार 500 रुपये इतके अनुदान दिले जाते. हे अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे.

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आपला अर्ज हा सोडत साठी ग्राह्य धरला जाईल आणि सोडत मध्ये निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल वरती कागदपत्रे अपलोड करणे विषयीच्या सूचना दिल्या जातील.

 

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार सातबारा होल्डिंग ही पोर्टलवर अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रांची छाननी करून संबंधित शेतकऱ्याला घटक उभारणीसाठी पूर्वसंमती दिल्या जाते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुढील 30 ते 45 दिवसांमध्ये कांदा चाळ उभारणी करावी लागते आणि काम पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाचे कृषी अधिकारी हे पाहणी करून कांदा चाळ अनुदान प्रस्ताव हा वरिष्ठ कार्यालयाला अनुदान प्राप्तीसाठी सादर करतात.

 

कांदाचाळ साठी लाभार्थी शेतकरी हे त्यांच्याकडे उत्पादित होणार्‍या कांदा नुसार त्यांना आवश्यक असणार्‍या कांदाचाळ क्षमते साठी अर्ज करू शकतात. यामध्ये आपण 5 मे टन, 10, 15, 20, आणि 25 मे टन क्षमतेच्या कांदाचाळ साठी पोर्टल वर अर्ज करू शकता. (MahaDBT Onion Storage Structure)

 

कांदाचाळ साठी जास्तीत जास्त अनुदान हे 87,500/- इतके आहे आणि हे कांदाचाळ च्या क्षमतेनुसार देण्यात येते. यामध्ये कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन साठी अनुदान 17500/- आहे, कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन साठी अनुदान 35000/- आहे, कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन साठी अनुदान 52500/- आहे, कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन साठी अनुदान 70000/- आणि कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन 87500/- अनुदान देय आहे. (MahaDBT Onion Storage Structure)

 

कांदाचाळ साठी निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12, होल्डिंग, हमीपत्र, बंधपत्र आणि निवड झालेल्या कांदाचाळ क्षमतेचा DPR म्हणजेच प्रोजेक्ट रीपोर्ट हे अपलोड करावे लागतात तरच त्यांना पूर्वसंमती देऊन काम सुरू करता येते.

 

 

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती : (MahaDBT Onion Storage Structure)

 

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)

स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

स्टेप 3: फलोत्पादन ही बाब निवडावी

स्टेप 4: तपशील मध्ये इतर प्रकल्प घटक बाब निवडावी

स्टेप 5: यंत्र सामग्री मध्ये कांदाचाळ निवडावे

स्टेप 6: संमती साठी चेक बॉक्स वरती क्लिक करावे

स्टेप 7: अर्ज जतन करावा

स्टेप 8: मुख्य पृष्ठ वरती यावे

स्टेप 9: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा

स्टेप 10: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा

वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर कांदाचाळ साठी अर्ज सादर करू शकता. (MahaDBT Onion Storage Structure)

 

अर्ज सादर केल्यानंतर आपला अर्ज हा जिल्ह्याच्या लक्षांक नुसार सोडत साठी विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला त्याच्या मोबाईल संदेश द्वारे निवड बाबत सूचित करण्यात येईल.