Namo Shetkari Mahasanman Nidhi : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृपी सन्मान निधी (PM-KISAN) ही योजना सुरु केली होती सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषानुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणा-या निर्देशाप्रमाणे शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असुन सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.
मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्याबाबतची घोपणा केलेली होती. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृपी सन्मान निधी PM KISAN योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी महासन्मान निधी” (Namo Shetkari Mahasanman Nidhi) ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दि.३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना सन २०२३-२४ पासुन खालीलप्रमाणे रावविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. (Namo Shetkari Mahasanman Nidhi)
सदर योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे राहतील :- (Namo Shetkari Mahasanman Nidhi)
- सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषनुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शोतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. या बदलांकरीता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही. (Namo Shetkari Mahasanman Nidhi)
- पी.एम.किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.
२. योजनेची कार्यपद्धती:-
पी.एम.किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणा-या पोर्टलवरुन/प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल. (Namo Shetkari Mahasanman Nidhi)
३. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली:-
- पी.एम.किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल/प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी.
- केंद्र शासनाच्या संमतीने पी.एम.किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण करण्यात यावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थींच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.
४. निधी वितरणाची कार्यपध्दती:-
“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या PM KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषि) यांच्या मार्फत वितरीत करण्यात येईल. (Namo Shetkari Mahasanman Nidhi)
१ पहिला हप्ता : माहे एप्रिल ते जुले : रु. २०००/-
२ दुसरा हप्ता : माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर : रु. २०००/-
३ तिसरा हप्ता : माहे डिसेंबर ते मार्च : रु. २०००/-
५. योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान झाल्यास करावयाची वसुली:-
सदर योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर लाभ धारकाकडून करावयाची वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येवून आयुक्त(कृपि) यांच्या मार्फत शासनाकडे जमा करण्यात यावी.
सहावा हाफता जमा
सादर योजना अंतर्गत पात्र लाभर्थ्यांना या योजनेचा सहावा हाफता त्यांच्या खात्या मध्ये वर्ग करण्यात आला असून आपण आपले स्टेटस हे आपण “नमो शेतकरी महासन्मान निधी” च्या साइट वर तपासू शकता. (Namo Shetkari Mahasanman Nidhi)