Posted in

Maharashtra Farmer Scheme : तुषार संच साठी मिळणार 80% अनुदान ? महाडीबीटी शेतकरी योजना

Maharashtra Farmer Scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Scheme : शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात चकरा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केलेले आहे.

महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल वर आपण कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. यासाठी सुरूवातीला आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी नोंदणी करणे आवश्यक असते. ती नोंदणी केल्यानंतर आपण विविध योजना साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.

सध्या Maharashtra Farmer Scheme राज्यातील शेतकर्‍यांना तुषार सिंचन ची आवश्यकता असते. तर या तुषार सिंचन साठी देखील आपण महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकता आणि या घटकासाठी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहे. तरी, इच्छुक शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज सादर करून घ्यावेत. (Maharashtra Farmer Scheme)

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना  – तुषार सिंचन

सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, तसेच पाण्याचा कार्यक्षम वपा होऊन उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना 80% अनुदान वरती तुषार आणि ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले जाते.

पात्र लाभार्थी

सर्व खातेदार शेतकरी हे या योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे: Maharashtra Farmer Scheme

 

  1. सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  2. आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  3. अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र
  4. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
  5. वैध जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)

तुषार संच अनुदान रक्कम 

अल्प व अत्यल्प भूधारक ( 2 हे पेक्षा कमी) शेतकर्‍यांना 80% तर इतर बहू भूधारक शेतकर्‍यांना 75% अनुदान देय आहे.  प्रधानमंत्री कृषि सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत 55/45% तर उर्वरित 25/30% हे मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत दिले जाते. Maharashtra Farmer Scheme

म्हणजेच, तुषार संच साठी शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत 13306/- (55%)  आणि मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत 6048/- (25%) असे एकूण रु. 19354/- अनुदान देण्यात येते.

क्षेत्र निहाय अनुदान बदल

 

तुषार संच साठी शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत 13306/- (55%)  आणि मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत 6048/- (25%) अनुदान देण्यात येते. तर, यापूर्वी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत शेतकर्‍यांना 1 हे क्षेत्र पर्यन्त रु. 13306/- असे अनुदान दिल्या जात होते. (Maharashtra Farmer Scheme)

 

परंतु, आता कृषि आयुक्तालया च्या 05 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रका नुसार लाभार्थ्याने अर्जा मध्ये नमूद केलेल्या क्षेत्रा नुसार अनुदान परिगणणा करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादर करत असताना लाभार्थ्यकडे क्षेत्र असेल तर किमान 1.00 हे साठी अर्ज सादर करावा किंवा क्षेत्र कमी असेल तर जेवढे असेल तेवढे अर्जा मध्ये नमूद करावे. कारण, आता यापुढे अनुदान परीगणना ही क्षेत्र नुसार करण्यात येणार आहे. Maharashtra Farmer Scheme

उदाहरण : एका शेतकर्‍याचे तुषार संच 75 एमएम साठी अर्जा नुसार प्रस्तावित क्षेत्र हे 0.40 हे असे आहे तर त्या शेतकर्‍याला केंद्र सरकार च्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे 7266/- इतके अनुदान देय असेल आणि हेच क्षेत्र जर 1.00 हे प्रस्तावित असेल तर अनुदान रक्कम ही 13306/- इतकी असेल.

अर्ज करताना ही काळजी घ्या? MahaDBT Farmer

तर, तुषार संच साठी आता Pro rata basis वरती अनुदान परिगणणा करण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत.

महाडीबीटी वर आपले असलेले सर्व गट क्रमांक आणि क्षेत्र हे जमीन तपशील मध्ये नोंदवावे

अर्ज करताना आपल्याकडे 1 हे पेक्षा अधिक क्षेत्र असेल तर तुषार संच साठी प्रस्तावित क्षेत्र हे किमान 1.00 हे टाकावे.

आणि एकूण क्षेत्र च जर 1.00 हे पेक्षा कमी असेल तर जेवढे क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र तुषार संच साठी प्रस्तावित करावे.

ऑनलाइन अर्ज

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपण महाडीबीटी शेतकरी योजना (MahaDBT Yojna) पोर्टल वर भेट द्यावी किंवा आपण आपल्या जावळी महा ई सेवा केंद्र ला भेट देऊ शकता. Maharashtra Farmer Scheme

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करताना शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी. महाडीबीटी पोर्टल वर आपण नवीन असाल तर नवीन शेतकरी नोंदणी करून घ्यावी त्यासाठी आपल्याला आपली आधार कार्ड आवश्यक असेल. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर आपण यापूर्वी नोंदणी केलेली असेल तर आपण अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडून आपण लॉगिन करावे. ( Maharashtra Farmer Scheme)

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर लॉगिन केल्याच्या नंतर अर्ज करा हा पर्याय निवडावा. त्यानंतर पुढे सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडून समोरील पेज वरती आपण आपले गावाचे नाव गट क्रमांक सिंचन पद्धती म्हणजेच तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन हा पर्याय निवडून हवे असलेली बाब घटक निवडावा आणि अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करावे. त्यानंतर परत मुख्य प्रश्न वरती येऊन अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करावे आणि अर्जाची फीस भरून आपला अर्ज सादर करावा.