CCI Cotton Procurement : हमीभाव कापूस खरेदीसाठी 01 सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार | नोंदणी साठी उपलब्ध होणार मोबाइल ॲप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 CCI Cotton Procurement : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात ‘सीसीआय’ ला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे कारण यावर्षी देखील कापूस पिका खालील क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. त्यादृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआय अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेले ५० टक्के शुल्क, केंद्र सरकारचा आयात शुल्क काढण्याचा निर्णय यामुळे देशातील कापूस बाजार दबावात आला आहे. तसेच, कापसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात ‘सीसीआय’ला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआय हे मोबाइल अॅपच्या माध्यमातून 01 सप्टेंबर पासून नोंदणी प्रक्रिया राबविणार आहे. CCI Cotton Procurement

 

शेतकऱ्यांना १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येईल. यंदा मध्यम कापसाचा हमीभाव 7710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव 8110 रुपये आहे. ‘सीसीआय’कडून यंदा लवकर आणि शेतकरी देतील तेवढा कापूस खरेदी केला जाणार आहे. CCI Cotton Procurement

 

गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरेदी जास्त होण्याची शक्यता आहे. खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी आणि शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉटही बुक करता येणार आहे. त्यामुळे हेलपाटे मारण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले आहे.

 

नोंदणीसाठी कपास किसान ॲप (Kapas Kisan App )

 

नोंदणीसाठी कपास किसान ॲप हे गुगल प्ले-स्टोअरवर ३० ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. त्याआधारे शेतकऱ्यांना १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. त्याकरिता ऑनलाइन अपडेटेड कापूस पीक पेरा असलेलेला सात-बारा अपलोड करावा लागेल. सरकार शेतकऱ्याची माहिती प्रमाणित करेल. त्याकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. माहितीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्रीकरिता सात दिवसांचा स्लॉट दिला जाईल. या सात दिवसांत कोणत्याही दिवशी व कोणत्याही केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे.

 

नोंदणीसाठी कपास किसान ॲप CCI Cotton Procurement

 

नोंदणीसाठी कपास किसान ॲप हे गुगल प्ले-स्टोअरवर ३० ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे तरी शेतकरी बांधव हे खाली दिलेल्या लिंक वरुण कपास किसान ॲप डाऊनलोड करू शकतील.

 

(सूचना : नोंदणी प्रक्रिया ही 01 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे तरी आपण 01 सप्टेंबर रोजी अपडेट ॲप डाऊनलोड करा .)

 

कपास किसान ॲप : येथून डाऊनलोड करा 

 

error: Content is protected !!