Agricultural Assistants : राज्यांमध्ये कृषी विभागाचे जवळपास सर्व कामे ऑनलाईन झालेली आहेत. म्हणजे यामध्ये राज्यातील शेतकरी हे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात त्यानंतर केलेल्या ऑनलाईन अर्जाची छाननी करण्याचे काम हे कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत ऑनलाइन केले जाते त्यामुळे जवळपास सर्व कामे ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत.
परंतु ही कामे करण्यासाठी राज्यातील कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी म्हणजेच कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांना शासनामार्फत कोणतेही लॅपटॉप किंवा संगणक हे साहित्य देण्यात आलेली नाही. तरी राज्यातील कृषी सहाय्यकांना (Agricultural Assistants) लॅपटॉप देण्यात यावा अशी संघटनेची मागणी मागील चार वर्षांपासून आहे तर नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळेमध्ये कृषी संघटनेने राज्यातील कृषी सहायकांना लॅपटॉप देणे बाबतची विनंती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना केली होती त्यानुसार राज्याची कृषिमंत्री यांनी ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या कृषी सहायकांना काम करण्यास अडचणी येऊ नये आणि कामाची गती वाढावी यासाठी आम्ही कृषी सहायकांना लॅपटॉप देणार आहोत अशी घोषणा त्या दिवशी केलेली आहे.
तर या राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळेमध्ये कृषी मंत्री कृषी विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्तांपासून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते यासाठी शेतीतील तंत्रज्ञान गट शेती शेतकरी उत्पादक कंपनी कृषी प्रक्रिया उद्योग कृषी विस्तार व विविध विषयावर ही कार्यशाळा घेण्यात आली आणि मार्गदर्शन करण्यात आले. (Agricultural Assistants)
तर या कार्यशाळेमध्ये राज्यातील महाराष्ट्र कृषी मंत्री यांना लॅपटॉपची सुविधा तसेच डेटा चार्जेस आणि पदनाम बद्दल बाबत मागणी केली आहे तसेच कृषी मंत्री यांनी आपल्या मागणी आहे त्यावरती लगेच शासनाकडे प्रस्ताव पाठवून देण्यात येईल असे सांगितले आहे. (Agricultural Assistants)
तर या निर्णयामुळे राज्यातील कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे कारण त्यांची बरेच दिवसांची प्रलंबित मागणी ही आता पूर्णत्वास जाणार आहे. राज्यातील कृषी विभागाच्या शेती अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळाल्यानंतर त्यांची ऑनलाइन कामकाज हे सोयीस्कर होणार आहे. (Agricultural Assistants)
परंतु राज्यातील कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत असून हा निर्णय पूर्णत्वास कधी जाणार याकडे वाट पाहून आहेत.
कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना संगणक किंवा लॅपटॉप हे अत्यंत आवश्यक आहे कारण राज्यातील कृषी विभागाचे जवळपास सर्व कामे ही महाडीबीटी पोर्टल मार्फत केली जातात. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर कृषी विभागाच्या सर्व योजनांची अर्ज स्वीकारले जातात त्यामध्ये राज्यातील शेतकरी हे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करतात त्यानंतर त्यांचा अर्ज हा 37 साठी ग्राह्य धरला जातो सोडत मध्ये निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन कागदपत्र अपलोड करावे लागतात त्यानंतर हा अर्ज छाननीसाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पाठविला जातो त्यानंतर कागदपत्रे यांनीही राज्यातील कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने केली जाते आणि छान आणि पूर्ण झाल्यानंतरच संबंध शेतकऱ्यांना निवड झालेल्या घटकासाठी पूर्वसंमती पत्र दिले जाते. तर एकंदरीत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते त्यामुळे कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांना लॅपटॉप असणे अत्यंत आवश्यक आहे. तर शासनाच्या आता या निर्णयामुळे हे काम कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी (Agricultural Assistants) यांच्याकडून जलद गतीने होण्याची शक्यता आहे.