Posted in

MahaDBT Applications : महाडीबीटी वरील जुने अर्ज रद्द होणार नाहीत …… आता प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य

MahaDBT Applications
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Applications : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी कृषी यंत्र अवजारे यांचा लाभ दिला जातो. 2019 पासून ही महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल राज्यात कार्यान्वित करण्यात आले होते. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सोडत पद्धतीद्वारे विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ दिला जात होता. परंतु आता या पोर्टलमध्ये बदल करण्यात येत असल्यामुळे यापुढे सोडत पद्धतीने एवजी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून त्यानुसार पोर्टल मधील सुधारणा करण्यात येत आहे.

 

परंतु बरेच शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम आहे की जुनी अर्ज हे महाडीबीटी पोर्टलवरील रद्द करण्यात येऊन सर्वांना नवीन अर्ज करावी लागतील या मुले सर्व शेतकरी बांधवांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. (MahaDBT Applications)

 

कृषी आयुक्तालय यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरील प्रलंबित राहिलेल्या 44 लाख अर्जांची वैधता ही कायम राहील असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे जे जुने अर्ज आहेत ते अर्ज रद्द न होता त्यांना पुढील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली महाडीबीटी पोर्टल वरील जुने अर्ज रद्द करू नयेत जर अगोदर अर्ज केलेले असतील तर आपल्याला पुढे त्या घटकाचा लाभ नक्कीच मिळेल. (MahaDBT Applications)

 

प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य (MahaDBT Applications)

 

कृषि यांत्रिकीकरणाच्या सध्याच्या सोडत पध्दत किंवा प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या पध्दतीचा अवलंब करण्यासाठी शेतक-यांकडुन अभिप्राय मागविण्याचा निर्णय कृषि विभागाने घेतला होता.  राज्यातील कृषि यांत्रिकीकरण योजनेत शेतकर्‍यांना सोडत पध्दतीत महाडीबीटी महाआयटी या संकेतस्थळावर कधीही अर्ज करता येतो. आलेल्या अर्जामधुन निघणार्‍या लॉटरीमधुन लाभार्थी शेतकर्‍यांची निवड केली जाते. मात्र कृषि मंत्री मा माणिकराव कोकाटे यांच्या भेटीत शेतकर्‍यांकडून कृषि यांत्रिकीकरणाच्या सध्याच्या लॉटरी पध्दती एवजी प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता यापुढे प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

 

तर, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरील अगोदर केलेल्या अर्जा मधून प्रलंबित राहिलेल्या 44 लाख अर्जांची वैधता ही कायम राहील असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे जे जुने अर्ज आहेत ते अर्ज रद्द न होता त्यांना पुढील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.