MahaDBT Beneficiary List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लाभार्थी निवड यादी – 22 ऑगस्ट 2025 | पहा आपल्या जिल्ह्याची निवड यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Beneficiary List : शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता वाढीसाठी आणि शेतीतील श्रमकष्ट कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध यंत्रसामग्री व अवजारांचे वितरण केले जाते. महाराष्ट्र शासनाने यासाठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल सुरु केले असून, या पोर्टलद्वारे पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर विविध योजना साठी शेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर पात्र शेतकर्‍यांची निवड केली जाते. 

 

महाडीबीटी पोर्टला द्वारे कृषी विभागांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा विविध योजनांमधून शेतकऱ्यांना शेतीविषयक यंत्रसामग्री मिळते. यात ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, पिक काढणी यंत्रे, पंप, मळणी यंत्र, फवारणी यंत्र, गवत कापणी यंत्र इत्यादी विविध घटकांचा समावेश होतो.

 

सोडत प्रक्रिया कशी होते? MahaDBT Beneficiary List

 

लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाते. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपला अर्ज सादर करावा लागतो. नंतर सर्व अर्जांचे परीक्षण करून पात्र अर्जदारांची यादी तयार केली जाते. सर्व पात्र शेतकऱ्यांमधून संगणकाच्या सहाय्याने प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य देऊन निवड प्रक्रिया राबवली जाते. यामुळे कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप टाळला जातो आणि निवड पूर्णपणे निष्पक्ष राहते.

 

ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी निवड

सोडतीद्वारे खालील घटकांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते:

ट्रॅक्टर – मध्यम व मोठ्या शेतकरी गटांसाठी

ट्रॅक्टरचलित अवजारे – नांगर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, बी पेरणी यंत्र इ.

स्वतंत्र यंत्रे – पिक काढणी यंत्र, मळणी यंत्र, फवारणी यंत्र, गवत कापणी यंत्र

फलोत्पादनासाठी विशेष साधने – छाटणीची साधने, फळ तोडणी उपकरणे इत्यादी

 

 

योजना लाभ घेण्याचे फायदे MahaDBT Beneficiary List

 

1. उत्पादनक्षमता वाढ – यंत्रांच्या वापरामुळे पिकांचे काम जलद व कार्यक्षम पद्धतीने होते.

2. श्रमकष्टांची बचत – मजुरांवरील अवलंबित्व कमी होते. MahaDBT Beneficiary List

3. अचूक शेती – आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शेतीतील प्रक्रिया अधिक नेमकी व वैज्ञानिक पद्धतीने पार पाडली जाते.

4. वेळेची बचत – पेरणी, नांगरणी, काढणी यांसारखी कामे कमी वेळेत पूर्ण होतात.

 

 

अर्ज प्रक्रिया

 

1. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी – फार्मर आयडी, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती देऊन नोंदणी करावी.

2. योजना निवड – आपल्या गरजेनुसार संबंधित योजना व घटक निवडावा. MahaDBT Beneficiary List

3. दस्तऐवज अपलोड – 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) इत्यादी अपलोड करणे आवश्यक.

4. अर्ज सादर – ऑनलाइन अर्ज पूर्ण करून सबमिट करावा.

5. सोडतीची प्रतीक्षा – पात्रता निकष पूर्ण झाल्यास सोडतीत सहभागी होता येते.

 

22 ऑगस्ट 2025 रोजीची सोडत 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे 22 ऑगस्ट 2025 रोजी काढलेल्या सोडत मध्ये खालील प्रमाणे जिल्हा निहाय शेतकरी यांची निवड झालेली आहे.

 

जिल्हानिवड संख्या
अकोला1536
अमरावती1331
अहिल्यानगर2683
कोल्हापूर783
गडचिरोली150
गोंदिया461
चंद्रपूर778
छत्रपती संभाजीनगर1394
जळगाव2029
जालना1774
ठाणे7
धाराशिव1738
धुळे1244
नंदुरबार341
नांदेड2559
नागपूर750
नाशिक1418
परभणी3030
पालघर20
पुणे1538
बीड2311
बुलढाणा3077
भंडारा357
यवतमाळ1734
रत्नागिरी22
रायगड16
लातूर2989
वर्धा1046
वाशिम1170
सांगली1059
सातारा1070
सिंधुदुर्ग292
सोलापूर2131
हिंगोली1313
एकूण निवड44151

 

 

जिल्हा निहाय सोडत यादी 

 

आपल्या जिल्ह्याची सोडत यादी : येथून डाऊनलोड करा

 

error: Content is protected !!