Posted in

MahaDBT Beneficiary List : अशी पहा महाडीबीटी योजनांची लाभार्थी यादी

MahaDBT Beneficiary List
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Beneficiary List : आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला त्या प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत वेगवेगळे कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

 

परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात चकरा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना (MahaDBT Beneficiary List) हे पोर्टल तयार केले आहे.

 

तर, या पोर्टल च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो परंतु यासाठी शेतकऱ्यांकडून या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज मागविले जातात आणि त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या लाभार्थी याद्या (MahaDBT Beneficiary List) या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल प्रसिद्ध केल्या जातात. तर याला भरती याद्या कशा पाहायच्या हे आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थी याद्या प्रसिद्ध केल्या जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत कृषी यंत्र व अवजारे या घटकांची लाभार्थी यादी जाहीर केले जाते. तसेच फलकपादन घटकांतर्गत फळबाग लागवड तसेच सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत तुषार ठिबक या घटकांची लाभार्थी यादी MahaDBT Beneficiary List जाहीर केले जाते.

 

 

तर लाभार्थी यादी या पोर्टलवर कशा पाहायच्या हे आपण खालील प्रमाणे पाहूया.(MahaDBT Beneficiary List)

 

प्रथम आपण महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर भेट द्यावी

त्यानंतर पुढील स्क्रीन वरती आपल्याला तीन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन अर्जाची सद्यस्थितीत तपासा त्यानंतर लॉटरी यादी आणि तिसरा ऑप्शन निधी वितरित लाभार्थी यादी असे तीन ऑप्शन आपल्याला दिसतील.

पुढे आपण लॉटरी यादी हा पर्याय निवडू शकता आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांची लाभार्थी यादी ही या ठिकाणी आपण पाहू शकतात.

त्यानंतर निधी-वित्रीत लाभार्थी यादी देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. (MahaDBT Beneficiary List)

निधी वितरित लाभार्थी यादीमध्ये आपण निवड झालेल्या लाभार्थ्याचे नाव निवड झालेल्या घटक असलेले अनुदान आणि वितरित केलेले अनुदान ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता.