Posted in

MahaDBT Farmer Portal Update : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल काही कालावधी साठी बंद? | या तारखेनंतर सुरू होणार

mahadbt farmer portal update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Farmer Portal Update : शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला त्या प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत वेगवेगळे कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

 

परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात चकरा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना (MahaDBT Farmer Portal Update) हे पोर्टल तयार केले आहे.

 

परंतु, नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून आता या पोर्टल मध्ये काही सुधारणा करण्यात येणार असून त्या कारणामुळे महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल हे दिनांक 15 एप्रिल पर्यन्त बंद असणार आहे. तर, आपण महाडीबीटी पोर्टल वर गेलयांनातर आपल्याला खालील प्रमाणे संदेश दिसेल….

 

प्रिय शेतकरी बंधू/ भगिनी,
महा डी बी टी शेतकरी पोर्टलमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. पोर्टल दि. 15/04/2025 नंतर पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील.

 

वरील प्रमाणे सूचना ही महाडीबीटी पोर्टल वर देण्यात आली आहे. तरी शेतकरी बांधवांनी या कालावधी मध्ये पोर्टल वर नवीन अर्ज सादर करू नयेत. 15/04/2025 नंतर शेतकरी हे पोर्टल वर अर्ज करू शकतील.  (MahaDBT Farmer Portal Update)