Posted in

MahaDBT Oil mill Subsidy : तेलघाणा, मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा ऑनलाइन अर्ज?

MahaDBT Oil mill Subsidy
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Oil mill Subsidy : शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला त्या प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत वेगवेगळे कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

 

परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात चकरा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना (MahaDBT Oil mill Subsidy) हे पोर्टल तयार केले आहे.

 

आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र (MahaDBT Oil mill Subsidy) किंवा जवळील कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात.

 

महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल वरती कृषी यंत्र अवजारे अंतर्गत मिनी ऑइल मिल (MahaDBT Oil mill Subsidy) या घटकासाठी देखील लाभ दिला जातो. मिनी ऑइल मिल घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

 

मिनी ऑइल मिल च्या माध्यमातून शेतकरी हे स्वतःचा तेलगण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. फॅमिली ऑइल च्या माध्यमातून शेतकरी हे तीळ करडई शेंगदाणे व इतर तेलबियांचे तेल हे घरच्या घरी काढू शकतात आणि त्याची विक्री देखील करू शकतात. तर हे यंत्र घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान दिले जाते. (MahaDBT Oil mill Subsidy)

 

महाडीबीटी पोर्टलवर मिनी ऑइल मिल साठी शासनामार्फत एकूण एक लाख 80 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.

 

तेलघाणा, मिनी ऑइल मिल (MahaDBT Oil mill Subsidy)

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी खालील प्रमाणे अनुदान देय आहे.

1. लहान सीमान्त शेतकरी/अल्पभूधारक : किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.1,80,000/- 

2. बहुभूधारक शेतकरी : किंमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त रु.1,44,000/-

 प्रमाणे अनुदान देय आहे.

ऑनलाइन सोडत मध्ये निवड झाल्यानंतर तेलघाणा/मिनी ऑइल मिल (MahaDBT Oil mill Subsidy) खरेदी करताना त्या मिल चा वैध टेस्ट रीपोर्ट असणे आवश्यक आहे आणि तसेच ज्या विक्रेत्याकडून आपण खरेदी करणार आहात त्यांच्याकडे ते विकण्यासाठी डीलरशिप प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.

 

 

तेलघाणा/मिनी ऑइल मिल ऑनलाइन अर्ज 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी खालील दिलेल्या पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करा.

 

 

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती :

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)

स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

स्टेप 3: कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडावी

स्टेप 4: तपशील मध्ये प्रक्रिया संच बाब निवडावी

स्टेप 5: यंत्र सामग्री मध्ये एक्स्ट्राक्टर (सर्व फळे/अन्नधान्य/गळीतधान्य) निवडावे

स्टेप 6: संमती साठी चेक बॉक्स वरती क्लिक करावे

स्टेप 7: अर्ज जतन करावा

स्टेप 8: मुख्य पृष्ठ वरती यावे

स्टेप 9: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा

स्टेप 10: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा

वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी अर्ज सादर करू शकता.

 

अर्ज सादर केल्यानंतर आपला अर्ज हा जिल्ह्याच्या लक्षांक नुसार सोडत साठी विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला त्याच्या मोबाईल संदेश द्वारे निवड बाबत सूचित करण्यात येईल.

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतामध्ये वापर करण्यासाठी विविध कृषी यंत्र व अवजारे यांचा देखील लाभ दिल्या जातो. तर या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उपयोगी विविध कृषी यंत्र व अवजारे जसे की ट्रॅक्टर ट्रॅक्टरचलित यंत्र तसेच पावर टिलर कल्टीवेटर नांगर रोटावेटर पेरणी यंत्र असे विविध कृषी यंत्र व अवजारे शासनामार्फत अनुदानावरती दिले जातात. (MahaDBT Oil mill Subsidy)

 

कृषी यांत्रिकीकरण घटकांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महाडीबीटी (MahaDBT Oil mill Subsidy) शेतकरी योजना या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज ऑनलाइन सोडत साठी ग्राह्य धरला जातो त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणाची सोडत यादी काढण्यात येते या सोडत यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी करत मोबाईल वरती निवड बाबतचा संदेश पाठविला जातो आणि कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातात.

 

कृषी यांत्रिकीकरण साठी संबंधित शेतकऱ्यांनी निवड झाल्यानंतर यंत्राचे कोटेशन यंत्राचा पेस्ट रिपोर्ट सातबारा होल्डिंग आधार बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Oil mill Subsidy) अपलोड करणे आवश्यक आहे.

 

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी केले जाते आणि त्यानंतर निवड झालेल्या घटक साठी संबंधित शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र दिल्या जाते आणि पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी निवड झालेल्या घटक खरेदी करून त्याचे ध्येय म्हणजेच बिल हे महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Oil mill Subsidy) अपलोड करणे आवश्यक असते.