MahaDBT Yojna : शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्याला एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्याला त्या प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत वेगवेगळे कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.
परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्यांना कृषि कार्यालयात चकरा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल, यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना (MahaDBT Yojna) हे पोर्टल तयार केले आहे.
आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र (CSC Center) किंवा जवळील कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात.
“महाडीबीटी – शेतकरी योजना” पोर्टल प्रकिया (MahaDBT Yojna)
महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल वर अर्ज केल्यानंतर कृषि विभाग सोडत यादी जाहीर करते म्हणजेच लॉटरी यादी प्रसिद्ध करते तसेच ज्या शेतकरी बांधवांची लॉटरी यादी मध्ये निवड झाली आहे त्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती निवड झाल्याचा संदेश देखील पाठविला जातो. निवड झाल्यानंतर शेतकर्यांना निवड बाब/घटक साठी आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी – शेतकरी योजना ह्या पोर्टल वरती उपलोड करावी लागतात. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रांची कृषि विभाग छाननी करते आणि कागदपत्रे योग्य असल्यास त्या लाभर्थ्यास निवड झालेला घटक/बाब खरेदी करण्यासाठी पुर्वसंमती देण्यात येते.
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभर्थ्याला तो निवड झालेला घटक खरेदी करून अनुदान मागणी करिता त्याचे बिल/इनवॉइस हे महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल वर अपलोड करावे लागते. त्यानंतर परत अपलोड केलेल्या बिल आणि निवड झालेल्या बाब/घटक नुसार लाभर्थ्याने खरेदी केलेल्या बाब/घटक ची कृषि विभाग जयमोक्यावर जाऊन पाहणी करते म्हणजेच मोका तपासणी केली जाते आणि त्यानंतर लाभर्थ्यास अनुदान अदा केले जाते.
तर अशा प्रकारे महाडीबीटी – शेतकरी योजना (MahaDBT Yojna) पोर्टल वरती प्रक्रिया पार पाडली जाते.
महाडीबीटी – शेतकरी योजना योजना पोर्टल बद्दल महत्वाची अपडेट
शेतकरी बांधवानो आता महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल द्वारे सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर निवड झाल्याचा संदेश त्या अर्जदाराच्या नोंदनिकृत मोबाइल वर दिला जाणार आहे. निवड झाल्यापासून 7 दिवसांमध्ये संबंधित शेतकर्यांना महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच यानंतरही ज्या शेतकर्यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत 3 दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल आणि या मुदतीमध्ये जे शेतकरी अर्ज सादर करणार नाहीत त्यांचे अर्ज सिस्टीम आपोआप रद्द करेल. म्हणजेच निवड झाल्यापासून एकूण 10 दिवसांमध्ये संबंधित शेतकर्यांना महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.
त्याचप्रमाणे पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर बिल सादर करण्याकरिता 25 दिवसांची मुदत दिली जाईल आणि या मुदतीमध्ये बिल सादर न केल्यास नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत 5 दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल आणि या मुदतीमध्ये ही बिल सादर न केल्यास सिस्टीम अर्ज आपोआप रद्द करेल. म्हणजेच 30 दिवसांमध्ये निवड झालेली बाब/घटक खरेदी करून बिल अपलोड करणे बंधनकारक असेल.
तर शेतकरी बांधवानो महाडीबीटी पोर्टल वर आपण अद्याप अर्ज केले नसतील तर आपल्या जवळील सीएससी केंद्र वरती भेट देऊन आपण अर्ज करू शकता आणि तसेच वरील प्रमाणे महाडीबीटी अपडेट नुसार निवड झाल्यानंतर विहित मुदती मध्ये प्रक्रिया पार पडावी.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील योजना
1. तुषार संच
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन साठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अनुदानावरती तुषार सिंचन वितरित केल्या जाते.
तुषार सिंचन साठी शासनाकडून शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान दिले जाते यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Yojna) तुषार सिंचनसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा अर्ज ऑनलाईन सोडत साठी विचारात घेतला जातो. ऑनलाइन सोडत झाल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड बाबतचा संदेश पाठवून कागदपत्रे अपलोड करण्यास सूचना दिल्या जातात. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून अर्जांना पूर्वसंमती दिल्या जाते आणि ही पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी निवड झालेल्या घटक म्हणजे तुषार संच खरेदी करून त्याचे बिल हे पोर्टलवर अपलोड करावे लागते.
2. ठिबक सिंचन
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अनुदानावरती ठिबक सिंचन वितरित केल्या जाते.
ठिबक सिंचन साठी शासनाकडून शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान दिले जाते यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ठिबक सिंचनसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
3. कृषि यंत्र
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतामध्ये वापर करण्यासाठी विविध कृषी यंत्र व अवजारे यांचा देखील लाभ दिल्या जातो. तर या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उपयोगी विविध कृषी यंत्र व अवजारे जसे की ट्रॅक्टर ट्रॅक्टरचलित यंत्र तसेच पावर टिलर कल्टीवेटर नांगर रोटावेटर पेरणी यंत्र असे विविध कृषी यंत्र व अवजारे शासनामार्फत अनुदानावरती दिले जातात. (MahaDBT Yojna)
कृषी यांत्रिकीकरण घटकांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महाडीबीटी (MahaDBT Yojna) शेतकरी योजना या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज ऑनलाइन सोडत साठी ग्राह्य धरला जातो त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणाची सोडत यादी काढण्यात येते या सोडत यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी करत मोबाईल वरती निवड बाबतचा संदेश पाठविला जातो आणि कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातात.
कृषी यांत्रिकीकरण साठी संबंधित शेतकऱ्यांनी निवड झाल्यानंतर यंत्राचे कोटेशन यंत्राचा पेस्ट रिपोर्ट सातबारा होल्डिंग आधार बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Yojna) अपलोड करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी केले जाते आणि त्यानंतर निवड झालेल्या घटक साठी संबंधित शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र दिल्या जाते आणि पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी निवड झालेल्या घटक खरेदी करून त्याचे ध्येय म्हणजेच बिल हे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते.
4. शेततळे
कृषी विभाग मार्फत राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Yojna) द्वारे शेततळे या घटकाचा देखील लाभ दिला जातो. शेततळे या घटकाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शेतकरी घटकासाठी अर्ज करताना विविध आकारमानाची शेततळे पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांना ज्या आकारमानाचे शेततळे तयार करायचे आहे ते आकारमान निवडणे आवश्यक असते. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर शेतकरी घटकाची सोडत यादी काढले जाते या सोडत मध्ये निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला निवड बाबतचा संदेश त्याच्या नोंदणीकृत मोबाईल वरती पाठवण्यात येतो आणि कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातात. ((MahaDBT Yojna))
शेतकऱ्यांनी शेततळे घटकसाठी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ज्या ठिकाणी शेततळे घ्यावयाचे आहे त्या ठिकाणची स्थळ पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे कृषी अधिकारी हे संबंधित शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन स्थळ पाहणी करतात आणि जागा शेततळे घेण्यासाठी योग्य आहे का हे तपासल्या जाते आणि योग्य असेल तर संबंधित शेतकऱ्याला त्या आकारमानाची शेतकरी खोदण्यासाठी पूर्वसंमती दिल्या जाते.
पूर्व संमती दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला त्या आकारमानाचे शेततळे हे पुढील 30 दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि त्यानंतर शेतीकडे पूर्ण झाल्याच्या नंतर कृषी अधिकारी हे तपासणी करून प्रस्ताव अनुदानासाठी पाठविले जातो.