Namo Drone Didi Yojana : राज्यातील शेतकर्यांना पिकांच्या फवारणी करिता येणारी प्रमुख अडचण म्हणजे मजूर उपलब्ध असणे. तर, शेतामधील मजूर टंचाई वरती मात करण्यासाठी शेती मध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. तर, यामध्येच आता शेतकर्यांना पिकांची फवारणी करण्यासाठी ड्रोन चा वापर करण्यात येत आहे. यामुळे, शेतकर्यांच्या शेतावरती अगदी कमी वेळेत फवारणी करणे शक्य झाले आहे.
भारत सरकारने “नमो ड्रोन दीदी” (Namo Drone Didi Yojana) ही योजना मंजूर केली आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतात १४५०० निवडक महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन पुरविण्यात येणार असून, या योजनेकरीता केंद्र शासनाकडून रु.१२६१.०० कोटी इतका निधि उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत ड्रोनच्या खरेदीसाठी महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन व इतर साहित्य/अनुषंगिक खर्चाच्या ८०% दराने जास्तीत जास्त रु.८.०० लाख पर्यंतचे केंद्रीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या दिनांक ०९.०४.२०२४ च्या पत्रान्वये तसेच, दिनांक २८.१०.२०२४ च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यात “नमो ड्रोन दीदी” या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबावणी व संनियंत्रणासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने “नमो ड्रोन दीदी” (Namo Drone Didi Yojana) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबावणी व संनियंत्रणासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने याच ड्रोन चा वापर वाढवा यासाठी आता नवीन योजना सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. महिला बचत गटांसाठी आता शासन ड्रोन खरेदी अनुदान देणार आहे. महिला बचत गटांसाठी या योजनेतून 8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
2024 ते 2026 या कालावधीत देशातील पंधरा हजार महिला बचत गटांना या केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून ड्रोन (Namo Drone Didi Yojana) खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. नंतर, हेच ड्रोन महिला बचत गट ह्या शेतकऱ्यांना भाडेतत्वार पिकांची फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देतील, अशी ही योजना केंद्र सरकारने महिला बचत गटांसाठी केली आहे. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांच्या ड्रोन योजनेसाठी 1261 कोटी खर्चाला मंजूरी दिली आहे. तर, ड्रोनमुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी फायदा होईल आणि तसेच त्यांच्या खर्चात, वेळेत बचत होईल.
कशी आहे ड्रोन दीदी योजना?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या योजनेमध्ये ज्या खत कंपन्या आहेत त्या महिला बचत गटांची निवड करतील. त्या गटातील सदस्यांना 15 दिवसांचे ड्रोन प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये 5 दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण अनिर्वाय आहे आणि तसेच 10 दिवस कीटक नाशक फवारणी प्रशिक्षण देण्यात येईल. Namo Drone Didi Yojana
अनुदान किती असेल?
तर, सध्या या ड्रोन ची किंमत ही 10 लाख रुपये आहे यामध्ये महिला बचत गटांना या योजनेद्वारे जास्तीत जास्त 80% किंवा 8 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
ड्रोन द्वारे फवारणी साठी एकरी दर किती आहे?
तर, सध्या उत्तर भारतामध्ये ड्रोन द्वारे एका फवारणी साठी एकरी 300 ते 600 रुपये भाडे आकारले जाते.
अर्ज कोठे आणि कसा करावा?
अनुदान साठी पात्र करण्यासाठी खत कंपनी ही महिला बचत गटांची निवड करनार आहेत तर अद्याप या योजना विषयी सविस्तर मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीयेत. सविस्तर मार्गदर्शक सूचना आल्यानंतर आपल्याला या संकेतस्थळा वरती उपलब्ध करून दिल्या जातील. Namo Drone Didi Yojana
नमो ड्रोन दीदी योजना मुळे राज्यातील शेतकरी महिलांना ड्रोन हे अनुदानावरती उपलब्ध करून दिल्यामुळे शेतीमधील फवारणी प्रक्रिया ही सुलभ होणार आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी चार चार पाच पाच तास द्यावी लागत होती त्या ठिकाणी या ड्रोन मुळे फवारणी ही केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये होणार आहे. ड्रोन मुळे शेतकऱ्यांचा फवारणी वरील वेळ आणि खर्च देखील वाचणार आहे. फवारणी ड्रोन साठी महिला शेतकऱ्यांना शासनाकडून प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे त्यामुळे याचा महिलांना चांगल्या प्रकारे फायदा होईल.
तसेच ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे फवारणी ही वेळेत करणे शक्य होईल परिणामी पिकांची उत्पादकतेमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.